गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

धरणी माय

रिमझिम सरींनी
धरणी माय तृप्त झाली
हिरवाईचा शालू नेसून
वसुंधरा खुलून आली
टपटपत्या शुभ थेंबानी
पाने न्हाऊन निघाली
फुलांचा हा सडा बघून
मनी दरवळ पसरली
गोड कंठाच्या कोकिळाने
गायला सुरूवात केली
पक्षाच्या किलबिलाटांनी
या मैफिलीत साथ दिली
सजलेल्या या सोहळ्यांनी
अंतरी पालवी फुटली
अन् स्वच्छंद आकाशाला
मनाने गवसणी घातली

- सुशिल म. कुवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा