।। आदिवासी राजा रावण।।
मूर्खांचा देश माझा
रावणा तुला जाळलं
खरं काय ?खोटं काय?
इथं कुणालाच नाही कळलं...
तुला जाळून सुद्धा रावणा
तू दरवर्षी मरत नाही
तुला जाळणार राम
रोज सीतेला संशयाने पाही...
तू सर्व शक्तिमान होता
तरी ना लावला सीतेला हात
मातीत तिला गाडून
रामानेच केला तिचा विश्वास घात....
तरी सुद्धा रामला ह्या
देशात पुजले जाते
षंढपणा लपवून रावणा
संन्याशाला फाशी देते....
इतिहासावर कधीच यांनी
बलात्कार केला
तुला जाळण्याचा अधिकार
चरित्रीहीन रामाला कुणी दिला....
आज खुलेआम रस्त्यावर
सीता भोगली जाते
तिला भोगणाऱ्या "रामला'
संत महंत बहाल होते...
तू धन्य आहेस रावणा
तू तरी शांत
इथल्या वासनाधिन राम मोकाट
एव्हडीच काय ती खंत...
सुशिल कुवर
फोटो: जयराम गावित सर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा