खरं खरं सांगतो राव ,
उगीच न्हायी ठेवत नाव....
या मोबाईलनं बिघडवलं
आता सारं माझं गांव....
पिंपळाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....
गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....
काय चाललंय ? कसं चाललंय?
एकमेकांत संवाद होता....
कबड्डी होती, कुस्ती होती,
आट्या - पाट्या, लपाछपी,
सुर-पारंब्यावरचे झोके होते,
ओढ्याच्या डोहात पोहणे होतं.
आंब्याच्या झाडावरच बसुन,
कच्चे-पिकलेले आंबे खायची मजा होती...
विटी-दांडु, खेळाच मैदान होतं,
इतर अनेक मैदानी खेळ होते...
उनाडक्या होत्या, मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...
चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे होते, ऊस होता...
गोठाभर ढोरं होती...
ढोरांबरोबर पोर होती....
जिवाला जीव देणारे,
दिलदार मित्र होते......
नवरात्र ढाक वादन होतं, डोंगऱ्यादेव होतं,
जात्यावरचं गाणं होतं.…
शाळेतल्या कवितेत ,
आनंदाचं उधाण होतं...
पण..............
जसं गावात हा कोठुन,
मोबाईल आला, नेट आलं....
चँनलच कनेक्शन,
घरा घरात थेट आलं...
गजबजलेलं गाव माझ,
आता निर्जन बेट झाल....
सकाळ संध्याकाळ सारी माणस,
टीव्हीलाच चिटकुन राहीली..
रस्तावर वर्दळ करणारी माणसे,
टीव्ही पुढंच सेट झालीत.....
मैदानावरील मुल सारी,
घरामागच्या अंधारात...
मोबाईल मध्येच, गुंतली सारी......
सुने सुने झाले पिंपळाचे पार,
मुके झाले चिरीचे ओटे....
दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....
खरं खरं सांगतो राव.....
या मोबाईलनच बिघडवल माझ सार गाव !
संकलन: सुशिल म. कुवर
फोटो : प्रतिकात्मक आवर्जून शेअर करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा